Press "Enter" to skip to content

स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे संस्थापक दिनेश सानप यांचे निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड या मंडळाचे संस्थापक व माजी अध्यक्ष दिनेश गणपत सानप यांचे आकस्मित कोरोना महामारीत दुःखद निधन झाले.अतिशय जिद्द व सामाजिक कार्यात सक्रिय असणारे ते कोलाड परिसरात सर्वाना परिचित होते.

याविषयी कोरोना संबंधित नियमांचे तंतोतंत पालन करून जेष्ठ नागरिक सभागृह कोलाड या ठिकाणी मिटींग आयोजित करुन दिनेश सानप यांना त्यांची उणीव केव्हा ही न भरून निघणारी आहे असे बोलून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या संघटनेचे संचालक कै.मारुती सहदेव नाकटे-किल्ला व ज्ञात अज्ञात यांना संघटनेच्या वतीने भाव पुर्ण श्रद्धांजली अर्पण करणेंत आली.

यावेळी जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ कुर्ले,सचिव अशोक कदम,अविनाश म्हात्रे सर, बाळ कापसे, मारुती राऊत,दगडू बामुगडे, प्रविण गांधी,सौ.प्रणिता गांधी,एल एस कदम, अनंत पवार,हरिचंद्र जाधव,केशव महाबळे,नंदकुमार पवार,बळीराम ठोंबरे, खराडे साहेब,सोनू दळवी, जनार्दन लोखंडे,व मंडळाचे असंख्य सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.