सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
महाराज साम्राज्य संघाचा दुसरा वर्धापन दिन पनवेल येथील निळकंठ पॅलेस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.यानंतर महाराज साम्राज्य संघाच्या कार्यकारणीची निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी खा. उदयनराजे भोसले,छत्रपती संभाजी राजे,यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थापक/अध्यक्ष दिलीप नाना सरकार यांच्या अध्यक्षतेखाली, युवराज किरण राजे भोसले, पूजा ताई आदी मान्यवरांच्या उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.व रायगड जिल्हा अध्यक्ष पदी (रायगडचा टायगर )निलेशभाई महाडीक यांची निवड करण्यात आली.
तर रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पवार,उपाध्यक्ष रोहित पवार,सचिव ज्ञानेश्वर जगताप, सल्लगार अनिकेत कांबळे,सरचिटणीस राजू सुतार,प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ तांबे,तसेच युवक कार्यध्यक्ष रुपेश मोहिते युवक अध्यक्ष प्रणय वाळंज, उपाध्यक्ष अविनाश भोसले, सरचिटणीस नितेश सुतार, सल्लगार अक्षय खरुसे, सचिव विशाल शेलार,संपर्क प्रमुख नितेश करंजे, सोशल मीडिया रायगड जिल्हा अध्यक्ष शुभम म्हात्रे, उपाध्यक्ष हितेश तांबे, यांची निवड करण्यात आली.
यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष नितेश भाई महाडीक यांनी आपले मनोगत व्यक्त सांगितले की सर्वपदाधिकारी यांनी झोकून काम करावे व आपली संघटना गावा गावा मध्ये पोहचली पाहिजे अन्याय तेथे न्याय देण्याचे काम आपली संघटना करेल.








Be First to Comment