सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील वैजनाथ येथे तालुका कृषी विभागामार्फत संपन्न करण्यात आलेल्या क्रुषी संजिवणी मोहीमेतंर्गत विविध प्रकारचे क्रुषीविषयक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले.या कार्यक्रमास ग्रामस्थ शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद
लाभला.
यावेळी कृषी विभागाकडून तूर बियाणे वाटप करण्यात आले तसेच शेतकऱ्यांना कृषी अँप डाऊनलोड करून दिले.तर कार्यक्रमाच्या वेळी तालुका कृषी अधिकारी के. जे. जाधव व मंडळ कृषी अधिकारी एम. बी. करे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वेगवेगळ्या वेबसाईट तसेच गट शेती योजना, पी. एम. एफ. एम. इ योजना, स्मार्ट योजना या तीन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उद्योग उभारणी करावी शेतीसोबत शेती पूरक व्यवसाय करावे असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना कृषी संजीवनी मोहिमेचे महत्व कमी जागेतून जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे याबाबतचे मार्गदर्शन सौ सारिका दिनेश दिघे सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले .
या कार्यक्रमाच्या वेळी प्रगतशील शेतकरी नथुराम भोईर देवकाने यांनी आपल्या शेतीतून वेगवेगळ्या पिकांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे या स्वतःच्या अनुभवाचे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले तसेच वैजनाथ गावचे दत्तात्रेय वातेरे ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थितांचे आभार मानून या योजनांचा लाभ आपण घ्यावा असे शेतकऱ्यांना सांगितले.कृषी विभाग आपल्या दारी आलेले आहे त्याचा आपण उपयोग करून घ्यावा जास्तीत जास्त उत्पादन काढूया आश्वासन दिले वैजनाथ गावचे पो. पाटील मनोज सावरकर, माजी सरपंच प्रदीप चोरगे,मारुती सावरकर,किशोर सावरकर,सत्यवान नगर,संजय मोरे व वैजनाथ गावचे ग्रामस्थ महिला शेतकरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment