रसायनी पोलिस आणि नागरिकांच्या प्रयत्नाने दांडफाटा थांब्यावर साकारली नवीन पोलिस चौकी
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
जिल्ह्यातील वाहतूक मार्गांवरील दांडफाटा हे महत्त्वाचे ठिकाण आहे.या थांब्यालगत भक्तांना पावणा-या आईं टाकेदेवीचे मंदिर असल्याने राज्यातील वाहतूक रस्त्यापैकी दांडफाटा हे महत्त्वाचे सर्वपरिचित थांबा अशी ओळख आहे.शिवाय मुंबई पुणे जुन्या महामार्गांवरील दांडफाट्याला केंद्रबिंदूचे स्थान आहे.याच दांडफाटा थांब्यावर विविध समस्यांची वानवा असल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.शिवाय पडिक चौकी असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
कोरोना पाश्र्वभूमीवर 22 मार्चं 2020 रोजी लाॅकडाऊन लागल्यानंतर जिल्हा सिलिंग पाॅईंट दांडफाटा येथे नाकाबंदी करताना नागरिकांची व पोलिसांची होणारी गैरसोय रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या लक्षात आली.यानंतर पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी पोलिसांना होणारी गैरसोय दांडफाटास्थली माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्याशी कथन करुन या थांब्यावर बहुउद्देशीय शेडची संकल्पना व्यक्त केली.
यावेळी पारंगे यांनी लक्ष घालून पंचायत समिती खालापूर व वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत निधीतून पोलिस चौकी उभारली.दरम्यान याअगोदर दांडफाटा येथे महामार्ग पोलिसांची पडिक चौकी होती.नाईंलाजास्तव तिचाच वापर पोलिसबांधव करीत होते.त्याच जागेत नवीन पोलिस चौकी पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या संकल्पनेतून साकारल्याने पोलिस बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या संकल्पनेतून दांडफाटा तसेच रसायनी काॅर्नंर येथे सिसीटीव्ही कॅमेरे,हायमास्ट पथदिवे बसविण्यात आले आहेत. रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे ये-जा करण्यासाठी दांडफाटा आणि रसायनी कार्नंरवर सिसीटीव्हीची नजर राहिल्याने रसायनीत चो-यांचे प्रमाण बंद झाले आहे.रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्याकडून कर्तंव्यदक्षाची कामे होत असताना समाजकारणही होताना दिसत आहे.दरम्यान रसायनी पोलिस आणि नागरिकांच्या सहकार्याने परिसरात विकासकामे होत असल्याने नागरिकांतून पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांचे आभार मानले जात आहेत.








Be First to Comment