Press "Enter" to skip to content

आपटी आणी उसरोली येथील महिलांसाठी माझी परसबाग मोहीम

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

ग्रामीण भागात शेताच्या बांधावर किंवा ओसाड माळरानावर पावसाळी महिला वर्ग विविध भाजी,कंदमुळे लागवड करीत असतात.मात्र काहिना जागेचा आभावामुळे लागवड करु शकत नाही.यामुळे नाईलाजाने बाजारपेठ उपलब्ध होत असलेली भाजी खरेदी करावी लागते.मात्र आपल्या जेवणात ताजी भाजी उपलब्ध व्हावी या दृष्टीकोणातून खालापूर तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली आपटी आणी उसरोली या गावातील महिला वर्गांसाठी माझी परसबाग ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मिरची, काकडी, वांग, दुधी, कारले अदिचे मिनी किट बियाणे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी महिला वर्गांचा मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

आपल्या घरासमोर किंवा घराच्या बाजूला भाजी लागवड करु शकतो.यामुळे आपल्या आहारात ताजी भाजी मिळणे शक्य होत असते.यासाठी थोडीशी मेहनत घेतल्यास आपणांस मोठ्याप्रमाणावर भाजी मिळत असते.यावेळी बियाणे लागवड पासून ते फळ येण्यापर्यंत काळजी कशी घ्यावी यांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी महिला वर्गांनी या परसबाग करण्यास सहमती दर्शवली.घर सांभाळीत असतांना भाजी साठी मोठ्याप्रमाणात पैसे खर्च होतो व रासायनिक भाजीपाला यावर मात्र चांगला पर्याय म्हणून परसबागेतील भाजीपाला लागवड हा आहे असे मत प्रज्ञा पाटील बी.टी.एम. ( आत्मा योजना ) यांनी व्यक्त केले.

यावेळी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) योजने अंतर्गत कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमात परसबागेतील भाजीपाला लागवड राबविण्यात आला. डी.बी.पाटील – (कृषी उपसंचालक सांख्यिकी कृषी आयुक्तालय पुणे महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते वाटप करण्यात आले लांडगे – तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय खोपोली, एम .एस .साळके – मंडळ कृषी अधिकारी खालापूर , आर.ए.आंधळे कृषी सहाय्यक , एन .व्ही.पाटील कृषी सहाय्यक,कृषी सहाय्यक सागर माने, शितल राजू डोखले सी आर पी चिलठण, खंडू डोखले उपसरपंच चिलठण, सदर कार्यक्रमास बचत गटातील प्रमुख महिला जोशना विकास चोरगे, अंजना नामदेव पाटील, मीना महेंद्र गोळे व महिला बचत गटातील सदस्य उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.