सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि कर्जत शहर महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मा.खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत दहिवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँगेसच्या अध्यक्षा ॲड.रंजना धुळे, रायगड जिल्हा सरचिटणीस पुजा सुर्वे, विधानसभा मतदार संघ अध्यक्षा उज्ज्वला हजारे, कर्जत शहर अध्यक्षा पुष्पा दगडे, गटनेते शरद लाड, नगरसेविका सुवर्णा निलधे, भारती पालकर, मधुरा चंदन, राजनी गायकवाड, नांदगाव सरपंच दीपिका जंगले, स्वाती कदम, गौरी कडू, सायली मनवे, जयवंत म्हसे, सुहास वांजळे, योगेश गंगावणे, महेंद्र लाड, लक्ष्मीकांत लाड आदी उपस्थित होते.








Be First to Comment