तीन ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ग्रामस्थांना तसेच उन्हाळी फळ-भाज्यांची लागवड करणाऱ्यांना होतोय फायदा
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे लघु पाटबंधारा योजने अंतर्गत बांधण्यात आलेले धरण हे 1977 साली पूर्ण बांधून तयार झाले. या धरणाची लांबी 325 मीटर असून धरणाची उंची 16.39 मिटर एवढी आहे. धरणामध्ये एकूण पाणीसाठा 2.320 दशलक्ष घनमीटर एवढा असून उपयुक्त पाणीसाठा 2.264 दशलक्ष घनमीटर एवढा आहे.
त्याचप्रमाणे या धरणामध्ये निरूपयोगी पाणीसाठा 0.056 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र 9.84 चौरस किलोमीटर आहे. तर भूसंपादन क्षेत्र 58.20 हेक्टर एवढे आहे. या धरणातील पाण्याची साठा पातळी 93.35 एवढी आहे. जोरदार पाऊस झाला तर पाण्याची पातळी 934.528 क्युसेस एवढी असते.
तालुक्यातील सुतारवाडी धरणाचा अवाढव्य परिसर आणि निसर्गरम्य परिसर असल्यामुळे तसेच आजूबाजूला अनेक प्रकारची हिरवी झाडे आणि फार्म हाऊस असल्यामुळे वर्षाच्या बाराही महिने येथील निसर्गाचे सौंदर्य आणि संथ वाहणारे पाणी पाहण्यासाठी हौसी पर्यटक येत असतात. हौसी पर्यटकां बरोबर मद्यपी सुद्धा येतात. त्या मुळे या परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच असतो परिसर अस्वच्छ होतो.
मात्र येथील इनचार्ज श्री. संदेश गोपाळ बिरवाडकर आणि त्यांचे सहकारी श्री. शिवाजी पांडुरंग सावंत हे जातीने लक्ष देऊन परिसर स्वच्छ राखतात.
या सुतारवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी येरळ ग्रामपंचायत, जामगाव ग्रामपंचायत आणि कुडली ग्रामपंचायत अशा ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या ग्रामस्थांना पिण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो.
या परिसरात अनेक सुसज्ज असे फार्म हाऊसचे व्यवसाय यां धरणाच्या पाण्यावरच चालतात. फार्महाऊस सह बगायतदार ही आहेत. सुतारवाडी धरणाचे क्षेत्र जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने श्री.संदेश बिरवाडकर आणि श्री.शिवाजी सावंत सातत्याने प्रयत्न करत असून सन 2015-16 या वर्षात 104.28 हेक्टर, 2016-17 ला 126.95 हेक्टर, 2017-18 ला 131.19 हेक्टर, 2018-19 ला 157.03 हेक्टर, 2019-20 ला 153.09 हेक्टर, सन 2021 ला 185.65 हेक्टर, या प्रमाणे दरवर्षी जास्तीत जास्त क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत.
सुतारवाडी धरणाच्या पाण्यावर उन्हाळी येथील स्थानिकांसह पेण, अलिबाग, पनवेल येथील शेतकरी कलिंगड तसेच विविध प्रकारचा भाजीपाला मोठ्या प्रमाणावर लावून उत्पादन घेत असतात.








Be First to Comment