प्रवासी, वाहनचालक नागरिकांना मोठा दिलासा
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात जोडणारा दांडफाटा येथे विविध समस्यांची वानवा असल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.दांडफाटा येथे पडिक चौकी असल्याने शिवाय या फाट्यावर सोयीसुविधा नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
दांडफाट्यावर पोलिस चौकी,सिसिटीव्ही कॅमेरा,हायमास्ट दिवे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी इतर सुविधा व्हावे अशी चर्चा रसायनी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे आणि माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्यात दांडफाटा पोलिस चौकीजवळ झाली होती. यावेळी माजी सरपंच कृष्णा पारंगे यांनी दांडफाटा थांब्यावरील समस्या सोडविण्यासाठी लक्ष घालून पंचायत समिती खालापूर व वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दांडफाटा येथे विविध विकासकामे करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

या विकास कामांचा लोकार्पण सोहळा दांडफाटा येथे मंगळवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
दरम्यान पंचायत समितीच्या माध्यमातून दांडफाटा येथील प्रवासी निवारा शेड उभारली या शेडचे उदघाटन सभापती वृशाली पाटील व उपसभापती विश्वनाथ पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.तसेच पंचायत समिती फंडामधून हायमास्ट दिवे,सार्वजनिक शौचालय बांधून त्याचे लोकार्पण उपसभापती विश्वनाथ पाटील,हभप मांडे महाराज यांच्याहस्ते करण्यात आले.
तसेच दांडफाटा येथील चारही बाजूंना लक्ष राहावे यासाठी माजी सरपंच कृष्णा पारंगे व रोटरीचे अध्यक्ष आल्हाद पाटील यांच्याकडून पोलिस चौकी उभारण्यात आली आहे.त्याचे उदघाटन रसायनी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे व सरपंच ताईं पवार यांच्याहस्ते करण्यात आले.

दांडफाट्यावर वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत निधीतून सिसिटीव्ही कॅमेरा लावण्यात आले असून त्याचे उदघाटन उपसरपंच राकेश खारकर व माजी उपसरपंच दत्ता शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.तसेच पंचायत समिती खालापूर आणि वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत निधीतून पोलिस मदत केंद्राचे सुशोभीकरण करण्यात आले असून या केंद्राचे उदघाटन माजी सरपंच अशोक मुंढे यांच्याहस्ते करण्यात आले.
तर नामफलकाचे अनावरण मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी व राष्ट्रवादीचे नेते अरुण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तर वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत निधीतून दांडफाटा येथे सार्वजनिक पाणपोई,मार्गदर्शिका आदीचींही व्यवस्था करण्यात आली आहे.दांडफाटा येथील या विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी रसायनी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे म्हणाल्या की,मार्चं लाॅकडाऊनमध्ये दांडफाटा येथे पडिक चौकी होती.पोलिसांसमोर आव्हान होते.गावाला जाणा-या लोकांचे लोंढे थांबवणे,या दांडफाट्यावर बसायला जागा नसने,शौचालय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी समस्या सोडविण्यासाठी माजी सरपंच कृष्णा गंगाराम पारंगे यांनी इतरांच्या मदतीने प्रयत्न केले.

रसायनी पोलिसांच्या प्रयत्नांना नागरिक नेहमी प्रयत्न करीत असतात असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी बोलताना सांगितले.तर माजी सरपंच कृष्णा पारंगे म्हणाले की असेच समाजोपयोगी उपक्रम रसायनी परिसरातील दोन ठिकांणावर करुन परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविणार असल्याचे सांगितले.यावेली पंचायत समिती सभापती वृशाली पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील,माजी सभापती कांचन पारंगे, सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर,माजी सरपंच अशोक मुंढे, माजी सरपंच कृष्णा पारंगे,माजी सरपंच लक्ष्मण पारंगे, उपसरपंच प्रतिप पाटील,माजी उपसरपंच दत्ता शिंदे, ग्रामविकास अधिकारी सुधीर तोंडळेकर, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दिपक कांबळी, राष्ट्रवादी चे नेते अरुण गायकवाड,काॅग्रेस आयचे तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे, युवा काॅग्रेस सचिव निखिल डवले,हभप मांडे महाराज, ग्रामपंचायत सदस्या श्वेता कांबळे, माधुरी जांभळे, ऊर्मिला डवले,स्वप्निल राऊत, रोटरीचे अध्यक्ष आल्हाद पाटील,माजी अध्यक्ष सुनील कुरुप,रेश्मा कुरुप, रसायनी पाताळगंगा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सिताराम म्हसकर,प्रमोद राईंलकर,सागर सुखदरे, देविदास म्हात्रे,अशोक पारंगे,अजय म्हस्कर ,दिलीप पारंगे,नामदेव कोकंबे,अशोक महाडिक आदी उपस्थित होते.कार्यंक्रमाचे सुत्रसंचलन संतोष चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन दिपक कांबळी यांनी मानले.








Be First to Comment