सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नगराजशेठ यांच्या पत्नी सौ. भवरीबाई यांचे वृद्धपकाळाने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर बोरी उरण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला. भवरीबाई यांच्या निधनानिमित्त आज तेरापंथी हॉलमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी या शोकसभेत येऊन नगराजशेठ यांचे व त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले.








Be First to Comment