रोहा शहर महिला अध्यक्ष म्हणून प्राजक्ता चव्हाण यांची नियुक्ती
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विकासकामांचा धूम धडाका आणि जनतेशी असलेला जिव्हाळा यामुळे पाले खुर्द, पाले बुद्रुक, आणि नागोठणे शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी सुतारवाडी येथील गीताबाग येथे खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, तसेच भाई टक्के, रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
याच वेळी रोहा शहर महिला अध्यक्ष म्हणून प्राजक्ता चव्हाण यांना खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले राष्ट्रवादी चे संस्थापक अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांची मेहनत, पक्षातील कार्यकर्त्यांवर असलेला विश्वास यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अभूतपूर्व यश प्राप्त झाले. कोरोनाच्या प्रचंड महामारीतही रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी अनेक विकास कामे केली. तरुणांना अपेक्षित असणारी जबाबदारी अनिकेत भाईंच्या सहकार्य पूर्ण होत आहे. तरुणांना संघटित केले तर पक्षाला अधिक मजबूती होईल हे का आ. अनिकेत तटकरे व त्यांचे सहकारी करत आहेत. पाले येथील महाबळे जिथे आहेत तिथे त्यांचे काम चांगले आहे. त्यांनी येथील तरुणांना घेऊन तरुणांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
या तरुणांनी पुढे आपल्या कौशल्याने पक्षाचे काम करावे. तरुणांची मजबूती फळी बसविण्याचे काम आ. अनिकेत तटकरे आणि त्यांचे सहकारी करत आहेत. सध्या तरुणांची पिढी राजकारणात उतरत आहे त्यामुळे येथील राष्ट्रवादीची ताकद अधिक मजबूत होत आहे. राष्ट्रवादी पक्षाकडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे पक्षाच्या कामाला अधिक बळकटी मिळत आहे.
रोहा शहरासाठी प्राजक्ता चव्हाण यांची नियुक्ती करत असून त्यांनी पक्षासाठी पुन्हा जोमाने काम करून महिला उत्तम प्रकारे पक्षाचे काम करत आहेत हे दाखवावे. ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली स्पष्ट भूमिका बजावली असून सरकार योग्य ती पावले उचलेल असे सांगून ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला अशा कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment