Press "Enter" to skip to content

भुवन गावचे प्रगतशील शेतकरी शंकर काटे यांचे दुःखद निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

माणगाव तालुक्यातील भुवन गावचे प्रगतशील शेतकरी तथा सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाची आवड असलेले शंकर नारायण काटे वय वर्ष(६७ ) यांचे अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले असून काटे परिवारावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे .

शंकर काटे यांनी अनेक वर्ष रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्मचारी पदाची सेवा केली कोलाड,पेन,महाड, अलिबाग आदी शाखेत त्यांनी नित्य नियमांनी काम केले तद्नंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली नंतर त्यांनी पत्नी समावेत आपल्या शेतीत लक्ष केंद्रित करत भात पीक व कडधान्याचे विविध पीक घेत पशूंचे पालन देखील उत्तम प्रकारे करत गाई बैल यांची जोपासना केली शांत आणि मनमिळाऊ स्वभाव सर्वाना सामाजिक कार्यात हातभार लावणारे काटे अचानक निघून गेल्याने साऱ्यांनाच त्यांचे दुःख अनावर झाले आहेत .

त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली दोन भाऊ एक बहीण सुना भावजय पुतणे नातवंडे असा मोठा काटे परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी शुक्रवार २ जुलै रोजी तर उत्तर कार्य रविवार ४जुलै रोजी त्यांच्या राहत्या निवास्थांनी मौजे भुवन येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांकडून प्राप्त झाली आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.