सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
गेल्या पाच वर्षांपासून आंबेवाडी-कोलाड विभागात चालू करण्यात आलेल्या बबली फिटनेस जीम यांच्याकडून संभे गावच्या परिसरात सुमारे १०० रोपांची लागवड करून व्रुक्षारोपण करण्यात आले.
बबली फिटनेस जीमचे प्रो.प्रा.बबली सानप आणि हरेश सानप व त्यांचा मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून सदरचे व्रुक्षारोपण करण्यात आले आहे.या व्रुक्षारोपण कार्यक्रम अंतर्गत त्यांनी आपल्या संभे गावाच्या परिसरात विविध जातीच्या रोपांची लागवड करून व्रुक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला.सध्याच्या धकाधकीच्या व तंत्रज्ञानाच्या युगात तरुण वर्गाचा फिगर अँड फिटनेसकडे कल वाढत चालला असल्याने व सध्याच्या काळाची गरज असल्याने बबली सानप व हरेश सानप यांनी आंबेवाडी-कोलाड परिसरातील आपल्या गावानजीक रोहे-कोलाड मार्गावर सुसज्ज अशा बबली फिटनेस जिमची स्थापना करून तरूण वर्गाला चांगली व्यवस्था करुन दिली आहे.

चांगल्या पद्धतीने कुशल प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाखाली जिममध्ये सरावाचे प्रशिक्षण दिले जात असल्याने जिमही नावारूपाला आली आहे. तर बबली सानप व हरेश सानप तसेच त्यांच्या मित्र परिवारांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या संभे गावाच्या परिसरात १०० रोपांची लागवड केल्याने पर्यावरण संवर्धन कार्यात थोडेफार सहकार्य केल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.








Be First to Comment