Press "Enter" to skip to content

रायगडचे खा.सुनील तटकरे यांची कोकण विकास समितीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चेअंती खासदारांचे आश्वासन

सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे |

कोकणच्या विकासासाठी आग्रही असणाऱ्या कोकण विकास समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच रायगडचे खा.सुनील तटकरे यांची त्यांच्या सुतारवाडी येथील कार्यालयात भेट घेतली.याठिकाणी झालेल्या भेटीदरम्यान कोकणच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.तर खासदार सुनील तटकरे यांनी शिष्टमंडळाला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबाबत समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

गेली काही वर्षापासून कोंकण विकास समिती मार्फत विविध विषय हाताळले जात असून या विषयावर पाठपुरावा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विनय सहस्रबुद्धे तसेच सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांचेजवळ चर्चा झाल्यानंतर नुकतीच कोकण विकास समितीचे संस्थापक जयवंत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडचे खा.सुनील तटकरे यांची दरम्यानच्या विषयाबाबत भेट घेऊन चर्चा केली.नवीन रेल्वे गाड्यांची मागणी तसेच नवीन रेल्वे मार्ग निर्मिती करणे,कोंकणातील आरोग्य सुविधा अध्यायावत करणे,आधुनिक शैक्षणिक सुविधासोबत कोंकण एज्युकेशनल अकादमीची निर्मिती, आधुनिक शेती – वृक्ष लागवड,ग्राम विकास अशा अनेक विषयावर चर्चा झाली.

यासमयी कोंकण विकास समितीचे सदस्य विजय मोरे,अक्षय महापदी, अनिल कदम,नरेश सुतार,विश्वास दरेकर,प्रशांत दरेकर,वैभव दरेकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील वीर,दासगाव, वहुर, सव,गोठे,रावढल,सापे,वामने,करंजाडी हा नवीन मार्ग निर्मिती करून वहुर व सापे या दोन गावांचे मधून जाणारे सावित्री नदीवरील पूल बांधणे. कोंकणातील आरोग्य सुविधा अध्यायावत करणे;अत्याधुनिक यत्रसामग्री ज्यामधे सी.टी.स्कॅन,एम.आर.आय व इतर मशिनरी यांचा समावेश असावा,कोंकण मध्ये एज्युकेशन अकॅडमी ची निर्मिती व्हावी ज्यामधे आय.ए.एस,आय.पी.एस, आय.आर.एस,एन.डी.ए. तसेच इतर स्पर्धापूर्व प्रशिक्षण दिले जावे;कोंकण रेल्वे हा शब्द असला तरी कोंकणातील रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्याना थांबा मिळत नाही.तरी दादर-चिपळूण,दादर-सावंतवाडी या नवीन रेल्वे गाड्या चालू करणे तसेच गणपती विशेष गाड्यांना दुर्लक्षित रेल्वे स्टेशनला थांबा मिळावा यावर लक्ष केंद्रित व्हावे अशा महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आल्याने अशोक मोरे, प्रदीप देशमुख,नितीन परब,प्रशांत दरेकर,विश्वास दरेकर,वैभव दरेकर, तुषार अडखळे, प्रशांत देशमुख,जीवन देशमुख,शैलेश मोरे,अमोल देशमुख,शशिकांत मोरे यांसह पदाधिकारी वर्गाने समाधान व्यक्त केले.

तर कोकण विकास समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.