खासदार सुनील तटकरेंनी केली पहाणी…. रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावले…
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
कोकणासाठी वरदान ठरलेल्या कोकण रेल्वे या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे काही ठिकाणी मात्र वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. या पैकी एक म्हणजे पावसाळ्यात पूराचा धोका.
रेल्वे प्रशासनाने दुपदरी ट्रॅक चे काम सुरू केल्या पासून रेल्वे ट्रॅक नजीक असणाऱ्या अनेक गावांना पावसाळ्यात पूराचा फटका बसतो याबाबत वारंवार सुचना करूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने संताप निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर रायगड चे खासदार सुनील तटकरे यांनी आज कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांसह रेल्वे ट्रॅक वरती उतरून पहाणी करत माणगाव मध्ये आढावा घेतला.
यावेळी बाजूने असलेल्या नाल्याची कामे वर्षानुवर्ष झाली नसल्याने खासदार तटकरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी करत तातडीने नाल्याची कामे करण्याच्या सूचना केल्या.








Be First to Comment