सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
मु.गोमासी,सुधागड-पाली येथील रहिवासी असणारा श्रेयस स्वामी श्रीनाथ जंगम याचे वयाच्या २८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
अत्यंत रूबाबादार व्यक्तिमत्त्व, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा तसेच प्रत्येक बाबतीत एक जबाबदारीने काम करणाऱ्या श्रेयस याचे अल्पकालीन वयामध्ये झालेल्या दु:खद निधनाने समस्त जंगम परिवारासह,त्याचे मित्रपरिवार व गोमासी परिसरासह संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फार्मासिस्ट असणारा श्रेयस पालीतील गव्हर्नर हाँस्पिटलमध्ये जाँबला होता.तिथेही तो आपली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे बजावत होता.
त्याच्या निधनाचे व्रुत्त समजताच त्याचे आप्तस्वकीय व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी त्याच्या निवासस्थानी भेट देऊन त्याच्या परिवाराचे सात्वंन केले.तर अत्यंत शोकाकूल वातावरणात कोरोना नियमावलीचे पालन करीत त्याचे अंत्यविधी पार पाडण्यात आले.
त्याच्या पश्चात आई,वडील व छोटा भाऊ व अन्य जंगम परिवार असा परिवार असून त्याचे अंतिम धार्मिकविधी शनि. दि.२ जुलै रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment