Press "Enter" to skip to content

गणूबाई म्हात्रे यांचे निधन

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

रांजणपाडा जासई येथील गणूबाई काशिनाथ म्हात्रे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धपकाळाने बुधवार दि. २३ जून रोजी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

त्यांच्या पश्चात मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि. २ जुलै रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर येथे तर दिवसकार्य रविवार दि. ४ जुलै रोजी रहात्या घरी रांजणपाडा जासई येथे करण्यात येणार आहे. याप्रसंगी कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नाही असे कुटूंबियांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.