सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
मागासवर्गीयांना पदोन्नतीत बढती न देणे, नोकर भरती न करणे, शिक्षणाच्या सवलती कमी करणे,बोगस आदिवासीवर कोर्टाने निर्णय देवूनही कारवाई न करणे, आरक्षण रद्द करणे आदी मागण्यां संदर्भात काल आरक्षणाचे जनक मा. छञपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल संस्थेच्यावतीने शासनास निवेदन सादर करण्यात आले.

मा. प्रांत अधिकारी कर्जत, व मा. तहसीलदार कर्जत यांचे मार्फत निवेदन महाराष्ट्र शासनास देण्यात आले. जिल्हा अध्यक्ष किशोर हिले, माजी सहसचिव विष्णू साबळे, दिपक सुपे, राम तिटकारे,भगवान बुरुड,रमेश भवारी, अक्षय तिटकारेे, कृष्णा हेमाडे, सतिश किरवे, सदाशिव बांबळे उपस्थित होते.








Be First to Comment