Press "Enter" to skip to content

तळवली तर्फे अष्टमी येथे क्रुषी संजीवनी कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथे क्रुषी संजीवनी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

तालुका क्रुषी विभागाचे वतीने विभागातील क्रुषी सहा. अधिकारी सारिका दिघे यांनी या कार्यक्रमात शेतकरी वर्गाला विशेष मार्गदर्शन करून शासनाकडून शेती व शेतकरी वर्गाच्या हिताचे द्रुष्टीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती सांगून लाभ घेण्याचे अवाहन केले.तर कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतकरी वर्गाला पावसाळी हंगामात शेतीच्या बांधावर लागवड करण्यात येणाऱ्या हमखास उत्पादन मिळवून देणा-या तूर बियाणांचे वाटप करण्यात आले.

यावेळी वसंत मरवडे, रघुनाथ कोस्तेकर,खेळू मरवडे,रामचंद्र मरवडे,दयाराम मरवडे,रामचंद्र बामणे,अरविंद भिलारे,काशिराम गायकर,लक्ष्मण मरवडे, हरि बामणे,सुरेश मरवडे,वामण नागावकर,वामण कोस्तेकर, धर्मा मरवडे,शशिकांत मरवडे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.क्रुषी विभागाचे वतीने राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमाबाबत तालुका क्रुषी विभागाचे तळवली ग्रामस्थांचे वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.