Press "Enter" to skip to content

सनातनचे संत आयुर्वेद प्रवीण पू.वैद्य विनय भावे यांचा देहत्याग !

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

मूळचे रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जून २०२१ या दिवशी रात्री १० वाजता मोर्डे (जिल्हा रत्नागिरी) येथे देहत्याग केला. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर २६ जूनला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

पू. वैद्य भावेकाका हे सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यातील मोर्डे येथे रहात होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. पू. भावे यांचा संपूर्ण परिवार सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधनारत आहे.

पू. वैद्य विनय भावे यांचा परिचय

पू. वैद्य विनय नीळकंठ भावे हे मूळचे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई या गावचे आहेत. वैद्य परंपरेची त्यांच्या घराण्यातील त्यांची पाचवी पिढी आहे. त्यांनी स्वतःच्या मालकीचा ‘श्री अनंतानंद औषधालय’ या नावाचा आयुर्वेदीय औषधे बनवण्याचा कारखाना स्थापून शास्त्रोक्त आणि प्रभावी औषधांची निर्मिती करत अनेक वर्षे आयुर्वेदाची सेवा केली. अवघ्या महाराष्ट्रातील वैद्यांमध्ये ते ‘वरसईकर वैद्य भावे’ म्हणून प्रसिद्ध होते. रुग्णांवर उपचार करणे, तसेच औषधनिर्मिती या दोन्ही क्षेत्रांतील त्यांचा अनुभव दांडगा होता. अभ्यासू वृत्ती, इतरांना सर्वतोपरी साहाय्य करणे, मनमिळाऊ स्वभाव आणि त्यागी वृत्ती ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. पू. भावे यांना रायगड जिल्हा परिषदेने २०१३ या वर्षी ‘रायगड भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. गेल्या काही वर्षांपासून ते महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा येथे आयुर्वेदशास्त्रातील संशोधक म्हणून सेवारत होते. त्यांच्या देहत्यागामुळे आयुर्वेद क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.