Press "Enter" to skip to content

मंदार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना शिवभोजन थालीचे मोफत वाटप



सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

एकीकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरीकडे कोरोनांचे संकट या कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहे.त्यातच प्रत्येकाची स्थिती उत्तमच असते असे नाही.तर काही ना दोन वेळच्या जेवणांची भ्रांत यामुळे एक दिवस का होइना त्यांच्या जेवणांचा प्रश्न मार्गी लावावा या विचारांतून मंदार नाना गायकवाड या युवकाने वाढदिवसांचे औचित्य साधून मोहोपाडा येथे शिवभोजन थाळी वाटप केली. यावेळी दोनशेपेक्षा अधिक शिव भोजन थाळीचे वाटप करण्यात आले.

वाढदिवस म्हणजे आपल्या जिवनातील मोठा आनंदाचा दिवस,प्रत्येक जण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात.मात्र हा दिवस आपण कुणाच्या तरी सहवासात साजरा करावा या उद्देशाने मंदार नाना गायकवाड यांनी शिवभोजन थाळी वाटप करण्याचा संकल्प केला.यावेळी शिव भोजन थाळी वाटप करताना प्रत्येकांच्या चेहऱ्यावर हास्य झळकत होते.कोरोना सारख्या ह्या महामारी प्रत्येकांना पोट भर अन्न मिळते असे नाही.मात्र आज वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकांची भुक मात्र शांत झाली याचेच मंदार नाना गायकवाड यांना समाधान मिळाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.