Press "Enter" to skip to content

कर्जतमध्ये ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भाजपचे आंदोलन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळाले पाहिजे या मागणीसाठी आज दि.26 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्यावतींने राज्यभर चक्का जाम, निदर्शने, आंदोलन करण्यात आली.त्याच भाग म्हणून कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने कर्जत मध्ये आंदोलन करण्यात आले.

राज्यातील ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळाले पाहिजे या मागणीसाठी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कर्जत तालुक्यात नेरळ आणि कर्जत येथे आंदोलन करण्यात आले.मराठा आणि ओबीसी ना देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण आघाडी सरकारने घालवल्याबद्धल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

सरकार विरोधी घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. कर्जत येथे आंदोलनाच्या वेळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चा कोकण विभाग संपर्क प्रमुख सुनील गोगटे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय कुलकर्णी, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे कर्जत शहर महिला मोर्चा अध्यक्ष सरस्वती चौधरी, शहर युवा मोर्चा अध्यक्ष मयूर शितोळे, माजी शहर अध्यक्ष दिनेश सोलंकी, उमरोली जिल्हा परिषद अध्यक्ष केशव तरे, पिंपळोली पंचायत समिती अध्यक्ष गुरुनाथ सोनावळे, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, तालुका अध्यक्ष शिरीष कदम,अभिनय खांगटे, राहुल कुलकर्णी तर नेरळ येथे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, सरचिटणीस राजेश भगत, नेरळ जिल्हा परिषद अध्यक्ष संदीप म्हसकर, पंचायत समिती अध्यक्ष अरुण नायक, राजन लोभी, श्रध्दा कराळे, धनंजय धुळे, किसान राजन लोभी, श्रध्दा कराळे,प्रकाश पाटील, रोशन पाटील आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.