Press "Enter" to skip to content

रोहा,मुरुड तालुक्यात येणाऱ्या बल्क ड्रग पार्क औद्योगिक प्रकल्पास विरोध

न्हावे, नवखार, सोनखार भूमिपुत्रांनी व शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्त संघटना स्थापन करून दर्शविली विरोध !

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्ह्यातील रोहा मुरुड तालुक्यातील १७ गावांमध्ये केंद्र व राज्य सरकार ने मंजूर केलेला सिडको ने टाकलेल्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून विरोध दर्शवला होता. अखेरीस सिडको प्रकल्प रद्द होऊन त्या बदली
“बल्क ड्रग पार्क “नावाचा औद्योगिक प्रकल्प येत आहे.

या प्रकल्पा करता येथील परिसरातील एकूण-४३०९ हेक्टर आर क्षेत्रफळ लागत असून त्यापैकी १९९५ हेक्टर आर क्षेत्रफळ संपादना साठी आधिसुचित करण्यात आले आहे. प्रस्तावित १९९५ हेक्टर आर क्षेत्रा पैकी ३२१ हेक्टर आर क्षेत्र सरकारी असून १६७४ हेक्टर आर क्षेत्र खाजगी आहे येथील भूमिपुत्रांनच्या हक्काच्या शेतजमीन आहेत. पिढ्यान -पिढ्या येथील भूमिपुत्र  प्रामुख्याने भात पीक घेतात तसेच बागायती व फळ उत्पादन सुध्दा घेतले जाते.मात्र औद्योगिक “बल्क ड्रग पार्क” प्रकल्प येत असल्याने शेतकरी व भूमिपुत्रांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. येथील येणारा प्रकल्प शासनाने १७ महिन्यात येथील भूमिपुत्रांनवर शेतकऱ्यावर लादण्याचा घाट घातला आहे. येथील प्रकल्पा बाबत शेतकऱ्यांसाठी कोणत्या ही प्रकारे चर्चा न करता शासना मार्फत घे घायी होत असल्याचे बोलले जात आहे.

परिणामी शेतकरी जमीनदार ह्यानी प्रकल्पास पुन्हा एकदा विरोध दर्शवत,
रोहा तालुक्यातील न्हावे, नवखार, सोनखार, ह्या गावातील भूमिपुत्रांनी तसेच शेतकऱ्यांनी संघटीत होऊन संघर्ष करण्या करता ते एकटावले व त्यानी येथील स्थापन केलेल्या समितीला “बल्क ड्रग पार्क “(एम आय डीसी) न्हावे, नवखार , सोनखार प्रकल्पग्रस्त संघटना असे नाव दिले आहे. स्थानिक पातळीवर या प्रकल्पा बाबात बैठका घेऊन त्यात चर्चा करून त्याचे दुष्परिणाम समोर आणत आहेत ते म्हणजे औद्योगिक प्रकल्प आल्यास येथील नैसर्गिक सौदर्य नष्ट होणार शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास  सुध्दा होऊ शकतो. याबाबी सुध्दा विचारात घेणे गरजे चे आहे.

येथील स्थापन केलेल्या समिती मध्ये अध्यक्ष प्रमोद कासकर, उपाध्यक्ष मिथुन सर्लेकर, तसेच खजिनदार महादेव शाबासकर, कार्याध्यक्ष-कमलाकर डबीर, सल्लागार सुरेश पोसतांडेल,सचिव सदानंद पाटील आदी कार्यकरणी स्थापन करून प्रकल्पास तीव्र विरोध दर्शवत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.