सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे क्लब प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांच्या संकल्पनेतून तसेच पुणे येथील सुप्रसिद्ध व्यवसायिक सचिनभाई मेहेता यांच्या आर्थिक योगदानातून उपजिल्हा रुग्णालय रोहे येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 1000 मास्कचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे प्रेसिडेंट मयुर दिवेकर यांच्या विशेष पुढाकाराने सध्या विविध लोकोपयोगी उपक्रमांचा झंजावात सुरू असून याबद्दल रोहेकरांकडून क्लबचे विशेष कौतुक होत आहे.
मास्क वाटपाच्या वेळी प्रेसिडेंट मयुर दिवेकर,उपजिल्हा रुग्णालय रोहा अधिक्षक तसेच रोटरी क्लब रोहा सेंट्रल सदस्या डॉ. अंकिता खैरकर,चार्टर्ड सेक्रेटरी रूपेश पाटील,क्लब डायरेक्टर मनोज बोराणा,अजित तेलंगे,डॉ. प्रथमेश बुधे व रुग्णालय स्टाफ उपस्थित होता.








Be First to Comment