विश्वनाथ पाटील यांचे रस्ता शोधून देण्यासाठी विविध ठिकाणी पत्रव्यवहार
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
रसायनी परिसरातील नावारुपाला असलेली ग्रूप ग्राम पंचायत वडगांव ग्रामपंचायतीच्या वेगळ्याच नावांचा चर्चेचा विषय बनला आहे.वाशिवली येथिल ब्रिज ( पुल ) ते स्मशाभूमी पर्यंतचा रस्ता पेव्हर ब्लॉक चा ग्रूप ग्राम पंचायती च्या फंडातून सन २०१७ – १८ मध्ये १३ ते १४ लाख रुपये खर्च करुन सर्वे नं. १/१अ गुरचरण या जागेत बनविला, मात्र गेल्या काही वर्षात जणू रस्ताच चोरीला गेल्याचा प्रकार वाशिवली येथे घडल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.सदर रस्ता चोरीला गेल्याची माहिती निदर्शनास येताच विश्वनाथ पाटील यांनी विविध ठिकाणी पत्रव्यवहार करुन आमचा हरवलेला रस्ता शोधून काढण्यासाठी विनंती केली आहे.
ज्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक चा रस्ता करण्यात आला होता ती जागा जरी महसूल विभागाकडे असली तरी सुद्धा या वरती नियंत्रण मात्र ग्रामपंचायत ठेवत आहे.मात्र गुरचरण या जागेत काम करण्यासाठी संबंधित तहसीलदार, जिल्हा धिकारी यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे विश्वनाथ पाटील यांनी सांगितले, तसेच वनविभाग चे अधिकारी स्व:ता अतिक्रमणाला प्रोत्साहन देत आहे.यामुळे यांची दखल घेवून तातडीने चौकशी करावी.
सदर चा रस्ता हा वनविभाग,महसुल,की जि.प.अलिबाग यांच्या यांच्या अंतर्गत येतो ही माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टीकोणातून पत्रव्यवहार करण्यात आले असून या संदर्भात स्पष्ट करावे.
रस्ता होणे चांगले आहे.मात्र तो चोरीला जातो.ही मोठी खेदाची बाब आहे.गेल्या एक वर्षापासून पहतो की रस्ता चोरीला गेला आहे. तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात बोलबाला असलेल्या या वडगांव ग्रूप ग्राम पंचांयत,हा रस्ता चोरीला गेल्यामुळे अनेक चर्चेला उधान आले आहे.सदर रस्ता तयार करण्यासाठी १३ ते १४ लाख रुपये खर्च करुन रस्ता चोरीला गेला असून रस्ता आम्हाला शोधून द्यावा? अशी मागणी सध्या सर्वसामान्यातून जनतेतून व्यक्त होत आहे.
वाशीवली येथिल गुरचरण जागेत ब्रिज ( पुल ) ते स्मशाभूमी पर्यंतचा रस्ता पेव्हर ब्लॉक चा ग्रूप ग्राम पंचायती च्या फंडातून सन २०१७ – १८ मध्ये १३ ते १४ लाख रुपये खर्च करुन सर्वे नं. १/१अ खर्च करुन बांधले मग रस्ता कोठे हरविला सदर पैसा हा जनतेच्या, कंपनीच्या कर वसुलीतून घेत असतांना त्या पैश्याचा योग्य वापर व्हावे संबधित कोणीही दोषी अढल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा.
विश्वनाथ पाटील – वाशिवली तक्रारदार









Be First to Comment