Press "Enter" to skip to content

कृषी संजीवनी मोहिम कार्यशाळेस शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील धानकान्हे या गावी कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या क्रुषी संजीवनी मोहिम कार्यशाळेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.

यावेळी कृषी विभागातील मढवी,सारीका दिघे, कविता दोरूगडे ग्रा.पं. सदस्या पुजा गोसावी,माजी सरपंच रखमा पवा, धोंडू कचरे, पो.पाटील पांडुरंग कचरे, माजी ग्रा.पं. सदस्य लक्ष्मण जाधव,सुदाम कचरे, रघुनाथ जाधव, सुभाष तुपकर आदींसह येथील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमातंर्गत मढवी यांनी शेती शाळेबाबत व भात लागवडीच्या पध्दती सांगून अधिक उत्पादन कशा पद्धतीने मिळविता येईल याबाबत माहिती सांगितली.तर कृषी सहाय्यक सारीका दिघे यांनी कृषीक अँप व जमीन आरोग्य पत्रिके नुसार खत मात्रा याबत मार्गदर्शन करून कृषी विभागातील विविध योजनांची माहिती सांगितली.तर कडधान्ये पिकामध्ये हमखास व शंभर टक्के उत्पादन देणाऱ्या तूर बियाणांचे वाटप करून या बियाणाची लागवड, अधिक उत्पादन कसे काढावे,तूरच्या रोपांची निगा व काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यशाळेचे आभार क्रुषीनिष्ठ शेतकरी पांडूरंग गोसावी यांनी व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.