सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील मुठवली खु.येथे तालुका कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आली.
यावेळी कृषी अधिकारी पल्लवी उबाळे,मिनल शिंदे, शांताराम तुपकर ,चंद्रकांत शिंदे लिंबाजी शेळके, भगवान तुपकर ,विठ्ठल शिंदे ,कृष्णा डिगे ,योगेश शिंदे ,राम सावंत तुलसी राम शेळके, महेश तुपकर, सहादेव शिंदे, पांडुरंग खरीवले, कविता शेळके आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमातंर्गत कडधान्ये उत्पादनासाठी कृषी विभागाकडून मोफत तुर बियाणांचे वाटप करण्यात आले.तर उपस्थित शेतकरीवर्गाला क्रुषी विषयक विविध योजना व कार्यक्रम यांची माहिती देणारे कृषिक अँप डाऊनलोड करून दिले तसेच जमिन आरोग्य पत्रिके नूसार खताचा वापर कसा करावा हे सांगून याबाबतची माहितीही देण्यात आली.
तसेच शासनाच्या मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ आपण वेळोवेळी घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करून आपण आपले शेतीतील उत्पादन वाढवू शकतो.त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास कृषी विभाग सदैव तत्पर असल्याचे उपस्थित अधिकारी वर्गानी सांगितले.तर हमखास उत्पादन देणाऱ्या तूर बियाणांचे वाटप करून त्याची लागवड व बियाणांचा वापर कसा करावा त्याचप्रमाणे तूरीच्या रोपांची काळजी व निगा याबाबतही माहिती सांगण्यात आली.








Be First to Comment