Press "Enter" to skip to content

वरसगाव भिरा फाट्यानजीक रस्त्यावर जीवघेणे खड्डे, प्रवाश्यांच्या जिवाला धोका

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

वरसगाव भिरा फाट्या जवळ पेट्रोल पंपा समोर असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जागोजागी खड्डे पडलेले असून येथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांसह प्रवाशी वर्गाला मोठा त्रास होत असुन यामुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

पाच मीटर अंतरापर्यंत जागोजागी खड्डे दरवर्षी पडतात. उन्हाळ्यात येथील डागडुजी तात्पुरती केली जाते. मात्र ही तात्पुरती केलेली डागडुजी पावसाळ्यात कुचकामी ठरते. मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या लहान लहान खड्ड्यांना वाहन चालक वैतागले आहेत. विशेष म्हणजे दुचाकी आणि रिक्षाचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करून मार्ग काढावा लागत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वास्तविक पाहता या रस्त्यावरील मार्ग हा मुंबई-गोवा महामार्ग असल्यामुळे रात्रंदिवस वाहतूक चालू असते. अनेक लहान-मोठी वाहने तसेच प्रवाशांची सातत्याने वर्दळ असल्यामुळे हा मार्ग सुस्थितीत असणे आवश्‍यक आहे. मात्र दरवर्षी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

मे महिन्यात भिराफाटा ते वाळंजवाडी पर्यंत आणि तेथून पुढे ज्या-ज्या ठिकाणी स्त्यावर खड्डे पडलेले होते अशा ठिकाणी सुसज्ज असे पॅच बसविण्यात आल्यामुळे भिरा फाटा ते विळे पर्यंत रस्ता सुस्थितीत झाला आहे. मात्र जागोजागी असलेले गतिरोधक रस्त्यावरील पॅच मुळे बुजले गेले आहेत. रस्‍त्‍यावर पॅच बसविताना तेथील गतिरोधक नामशेष होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक होते. आता मात्र गतिरोधक गायब झाल्याने वाहन वेगाने जात आहेत. कोलाड ते सुतारवाडी मार्गे विळे कडे अवजड सामान घेऊन जाणारे ट्रक, ट्रेलर नियमितपणे धावत असतात. ठराविक ठिकाणी जर गतिरोधक नसतील तर वाहन चालकांचा वेगावर नियंत्रण राहणार नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.