Press "Enter" to skip to content

अखेर कर्जत रेल्वे स्थानकात स्वच्छतागृहाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वर असलेल्या स्वच्छतागृहावर काही दिवसांपूर्वी झाड पडल्यामुळे शोचालाय बंद पडले होते. या मुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. स्वच्छतागृहावर पडलेले जुने महाकाय झाड त्वरित हटविण्यात यावे व प्रवाशांची होणारी गैरसोय त्वरित दूर करण्यात यावी अशी मागणी कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासन केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि स्वच्छतागृहाचे काम सुरू करण्यात आले आले.

स्वच्छतागृहावर झाड पडल्याने सुमारे दोन – अडीच महिने प्रवाशांची गैरसोय होत होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी दि. 13 जून रोजी रेल्वे प्रशासन कडे स्वच्छतागृहावर पडलेले झाड त्वरित हटविण्यात यावे. अशी लेखी मागणी केली होती. त्यांच्या मागणी ची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना दि. 16 जून रोजी स्वच्छतागृहावर पडलेले झाड हटविण्याचे काम व सदर शोचालाय च्या दुरुस्ती चे काम लवकरच करण्यात येईल असे लेखी कळविण्यात आले होते.

त्या नुसार स्वच्छतागृहावर पडलेले झाड काढून पडझड झालेल्या स्वच्छतागृहाचे काम सुरू करण्यात आले असून हे काम लवकरच पूर्ण होईल व प्रवासाची होणारी गैरसोय दूर होईल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.