Press "Enter" to skip to content

टेंभोरडे येथील आदिवासी वाडी येथे जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

आपण जगता जगता दुसऱ्यासाठी जगणे हा जीवनातील वेगळा आनंद आहे.असे प्रतिपादन बारशिव येथील मिनार मनोहर चिले यांनी भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील टेंभोरडे येथील आदिवासी वाडी येथे जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

मार्च 2020 पासून कोरोना चे संकट आहे स्थानिक मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांच्या हातून रोजगार गेला असल्याने त्यांची परिस्थिती ही हलाखीची झाली आहे आणि त्यातच झालेल्या वादळामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच निवाऱ्याचे नुकसान झाले आहे त्यामुळे काहीजणांच्या घरात एक वेळ अन्न शिजणे मुश्किल झाले.त्यांना मदत करण्याचे ठरविले.आम्ही केलेली मदत म्हणजे तुटपुंजी आहे.आज जी मदत करण्यात आली आहे त्यामध्ये सर्व समाजातील गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहचविण्याचा प्रामाणिक हेतू आहे.यापुढेसुद्धा आम्हाला जितके शक्य होईल तितकी मदत करू अशी आशा मिनार मनोहर चिले यांनी यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी भोईघर ग्रामपंचायतचे माजी सदस्य राजेश महाडिक,प्रवीण महागावकर,रोहन यादव,योगेश चोगले,रोहन यादव,हर्षद खेडेकर, नितेश महाडिक,वैभव सारंगे, सुयोग महाडिक, आदीसहित युवक उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.