Press "Enter" to skip to content

देवकान्हे येथे कृषी संजीवनी मोहीम यशस्वीरीत्या संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

शेती क्षेत्राचे विकासासाठी रोहे तालुका क्रुषी विभागामार्फत विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तालुक्यातील देवकान्हे या गावी कृषी संजीवनी मोहीम यशस्वीरीत्या संपन्न करून शेतकरी बांधवांना विविध कृषी विषयक योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी क्रुषी विभागातील श्री. हेगडे, सारिका दिघे,कविता दोरूगडे,येथील सरपंच वसंत भोईर,ग्रा. पं.सदस्य दयाराम भोईर,रिया भोईर, म्रुणाली बामणे,निलिमा भोईर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव भगिनी उपस्थित होत्या.

उपस्थित शेतकरीवर्गाला कृषी विषयक विविध योजना व कार्यक्रम यांची माहिती देणारे कृषिक अँप डाऊनलोड करून दिले तसेच जमिन आरोग्य पत्रिके नूसार खताचा वापर कसा करावा हे सांगितले याबाबतची माहिती देण्यात आली.सध्या शेती क्षेत्रावर विविध संकटांची मालिका सुरू असून शेतकरी वर्ग द्विधास्थितीत सापडला आहे. असे जरी असले तरी शेती ही आपली दुसरी माता असून आपल्या परिवाराचे कल्याण करण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी असल्याने आपण आपला अन्य व्यवसाय सांभाळून शेती क्षेत्रालाही विशेष प्राधान्य दिले पाहिजे. तर शासनाच्या मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ आपण वेळोवेळी घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करून आपण आपले शेतीतील उत्पादन वाढवू शकतो.त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास क्रुषी विभाग सदैव तत्पर असल्याचे क्रुषी विभागाचे श्री.हेगडे यांनी सांगितले.तर हमखास उत्पादन देणाऱ्या तूर बियाणांचे वाटप यावेळी शेतकरी वर्गाला करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.