सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
तरशेत येथील वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू कीर्तनकार व प्रवचनकार ह. भ. प . उमाजी महाराज खाडे यांचे वृद्धपकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. रायगड जिल्ह्यातील आदर्श शिक्षक टिळक खाडे यांचे ते वडील होत.
ह.भ.प.उमाजी महाराज खाडे यांनी प्रवचनाच्या व विविध धार्मिक ग्रंथांच्या माध्यमातून गेली ५० वर्षे सामाजिक प्रबोधनाचे अविरतपणे काम केले. शिहू – बेणसे परिसरात वारकरी संप्रदायाच्या बीजारोपणाचे काम त्यांनी ऐंशीच्या दशकात केले. श्रावण महिन्यातील ग्रंथवाचनाची परंपरा त्यांनी अखंडपणे चालू ठेवून ज्ञानेश्वरी , गाथा , भागवत , दासबोध यांसारखे धर्मग्रंथ त्यांना मुखोद्गत होते. प्रेमळ व नम्र स्वभावामुळे ते सर्वांचे आवडते होते. धार्मिक कार्याबरोबरच त्यांना सामाजिक कार्याचीही आवड होती. १९८४ ते १९८९ या काळात मुंढाणी ग्रामपंचायतीवर त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली होती. १९८९ च्या महापूरातील तरशेत , मुंढाणी व जांभूळटेप आदी गावांतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करुन त्यांनी मार्गी लावला होता.
त्यांच्या निधनाबद्दल अध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करुन दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुलगे , एक मुलगी , सुना , जावई व नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रिया विधी शिवशंभो देवस्थान शिहू येथे दिनांक २ जुलै रोजी तर उत्तरकार्य त्यांच्या राहत्या घरी तरशेत येथे दिनांक ४ जुलै रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment