सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ कोकण विभाग अंतर्गत रोहे तालुका कार्यकारिणी यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठीचे निवेदन नायब तहसीलदार निलम दोरजकर यांना देऊन आपल्या रास्त मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी शासनाचे लक्ष केंद्रीत केले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे,महासचिव सचिन राजुरकर, समन्वयक अशोक जीवतोडे, राज्य प्रदेश अध्यक्ष प्रकाश भांगरथ,को.विभागिय अध्यक्ष एकनाथ तारमळे,कोकण महिला अध्यक्षा अपर्णा खाडे,राज्य अध्यक्ष श्याम लेंडे,शाखा सरचिटणीस अनिल नायपल्ले,कोकण वि.अध्यक्ष अरुण मडके यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभाग ओबीसी महिला अध्यक्षा संगिता म्हात्रे, रा.जि.अध्यक्ष अँड.अविनाश भगत, तालुका कार्यकारिणीचे नारायण गायकर, संतोष खलापकर,प्रविण घाग,निवास थळे,जयवंत घाग,संदीप चव्हाण आदींनी आपल्या हस्ते नायब तहसिलदार निलम दोरजकर यांनासदरचे निवेदन देण्यात आले आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कोर्टाकडून रद्द झाल्याने व पदोन्नतीमधील आरक्षणही राज्य सरकारने रद्द केले आहे तसेच ओबीसी जातवार जनगणना, सरकारी पदोन्नती आरक्षण बाबत ओबीसी जनमोर्च्याच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने संपन्न झाली.
या अंतर्गत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने रोहे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.सदर आंदोलना दरम्यान देण्यात आलेले निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ओबीसी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या संविधानिक न्याय्य मागण्याची निवेदने तहसीलदार मार्फत देण्यात येणार आहेत.








Be First to Comment