Press "Enter" to skip to content

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक दिन साजरा

आमदार भरतशेठ गोगावले व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांना मिळाला पालखीचा मान

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार ३४८ व्या शिवराज्यभिषेक दिन बुधवार दिनांक २३ जून २०२१ रोजी रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमास महाड चे आमदार भरतशेठ गोगावले व उरण चे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

या वेळी शिवराज्यभिषेक दिना निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिषेक व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात करण्यात आले. तसेच रायगडावर शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळयात सहभागी होऊन आमदार भरतशेठ गोगावले व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांना पालखीचा मान देण्यात आला.

या कार्यक्रमास उपजिल्हासंघटक परेश पाटील, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटिल, माऊली घोगरे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.