Press "Enter" to skip to content

खालापूरकरांनो सावधान : छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळणार

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

मतदारांचे मतदार यादी मध्ये छायाचित्र नसल्यास नाव वगळण्यात येणार असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे .खालापूर तालुक्यात 186 मतदार केंद्र असून मतदारांचे मतदार यादी मध्ये छायाचित्र नसल्याचे सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे.

मतदाराचे रंगीत छायाचित्र गोळा करण्याचे काम केंद्रस्तरीय अधिकारी करीत आहेत .स्थलांतरित मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली असता मतदार तेथे आढळून आल्याने तसे पंचनामे करण्यात आले आहेत. मतदारांनी यादी तपासून रंगीत छायाचित्र तहसील खालापूर येथील निवडणूक शाखा किंवा संबंधित सजाचे तलाठी कार्यालय, मतदार केंद्राचे केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे 30 जून 2021 पूर्वी जमा करावे असे तहसीलदार खालापूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. छायाचित्र नसलेल्या मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे.

त्यामुळे मतदारांनी तहसील कार्यालय खालापूर येथे मतदार यादी पाहून छायाचित्र नसल्यास दिलेल्या मुदतीत रंगीत छायाचित्र देण्याचे आव्हान खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.