लेखाधिकारी राजेंद्र परदेशी यांचा बेजबाबदारपणा
सिटी बेल | पेण | प्रतिनिधी |
एसटीच्या रायगड विभागीय रामवाडी कार्यालयामध्ये डिझेल करिता ठेवलेले जवळपास एक ते दिड कोटी रुपये शासनाचा आदेश नसतानाही शेकडो कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगाराकरीता वापरल्याची धक्कादायक घटना पेण रामवाडी कार्यालयात नुकतीच घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एसटी महामंडळाचे रायगड विभागीय कार्यालय पेण येथे असून या कार्यालयातील लेखाधिकारी राजेंद्र परदेशी यांनी एसटीला रोज लागणाऱ्या डिझेल करिता ठेवलेले सुमारे दीड कोटी रुपये कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय आदेश नसताना शेकडो कामगारांच्या पगार खात्यात टाकून घोळ घातला असल्याने या लेखाधिकारी यांचा बेजबाबदारपणा पुढे आला आहे.याबाबत आपली झालेली चूक लक्षात येताच लेखाविभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची एकच धावपळ उडाली असून संबंधितांनी एसटीच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांच्यासह संबंधित बँकांशी संपर्क साधून सदरची रक्कम रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र यात काही कर्मचाऱ्यांनी आपला पगार झाला असल्याने तात्काळ पैसे काढून घेतले आहेत.त्यामुळे या बेजबाबदार घटनेमुळे एसटीच्या डिझेलकरिता ठेवलेला निधी कर्मचाऱ्यांच्या पगारा करीता वापरल्याने रायगडातील एसटीचा चक्काजाम होण्याची भिती नाकारता येत नाही.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी काही वरिष्ठांसह कर्मचारी यांनी केली आहे.








Be First to Comment