सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
“रंजल्या जीवाची मनी धरी खंत,तोची खरा साधू तोची खरा संत” या उक्तीप्रमाणे नेहमीच गोरगरीब माणसांची जाणीव ठेवत सामाजिक बांधिलकी जपत आज हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड , तळोजा – सामाजिक सहभाग व ग्रामीण विकास अंतर्गत कंपनीने पनवेल तालुक्यातील नितालेमानपाडा या आदिवासी वाडीवर जीवनावश्यक धान्य,कडधान्य,मास्क आणि ऑक्सिजन लेवल सुरळीत ठेवण्यास मदत करणारी औषधी पुरचुंडी यांचे वाटप केले.
नितालेमानपाडा ही ९६ कुटुंब असलेली आदिवासी वाडी आहे.मजुरीवर पोट भरणारी ही वाडी.सततचा वाढत जाणारा लॉक डाऊन ह्या कुटुंबाना हालअपेष्टा देणारा ठरला आहे.त्यामुळे उदरनिर्वाह करण्यास खूप मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागत होते.परंतु हिंडाल्को कंपनीने या वाडीला कायमच मदत केलेली आहे.
या कामी युनिट हेड सोमोजीत डॉन ,एच.आर. हेड सुधीर मिश्रा , सी.एस.आर.चे लहू रौंधळ साहेब यांनी कायमच कंपनीकडून वाडीला मदत मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. पिण्याच्या पाण्यापासून ते शाळा नूतनीकरण , शाळेसाठी नविन संडास, कंपाऊड, नविन अंगनवाडी, नविन समाज मंदिर , महिलांसाठी मशीन काेस आणि आरोग्य सुविधा ते जीवनावश्यक गोष्टींचे वाटप अशी अनेक कामे सामाजिक बांधिलकी जपत कंपनी करीत आली आहे.

मागच्या वर्षीही कंपनीने खूप सहकार्य केले होते.आज त्यांनी केलेल्या मदतीमुळे कुटुंबाना खूप मोलाची मदत झाली आहे.किमान पोटभर जेवण मिळेल या आनंदात वाडीतील कुटुंबांनी हिंडाल्को कंपनीचे मनापासून आभार मानले.आणि असेच सहकार्य मिळो ही विनंतीही केली.
यावेळी हिंडाल्को कंपनीच्या वतीने सी.एस.आर. चे लहू रौंधळ सर, मदनेस ओझासर , पशांत माली, व वाडीचे वसंत कातकरी,गुरूनाथ कातकरी,शाळेचे मुख्याध्यापक चिलेसर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment