सिटी बेल | उरण | सुनिल ठाकुर |
उरण पूर्व विभागातील सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास पाटील यांच्या मातोश्री ह भ प कै. गोमुबाई श्रीपत पाटील यांचे सोमवार दिनांक २१/०६/२०२१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्यावर पाले येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक ३०/०६/२०२१ रोजी श्री क्षेत्र उद्धर पाली येथे होणार आहे उत्तर कार्य विधी दिनांक शुक्रवार दिनांक ०२/०७/२०२१ रोजी राहत्या घरी पाले – उरण येथे होणार आहे.








Be First to Comment