Press "Enter" to skip to content

ज्येष्ठ कलाकार प्रभा अडावदकर यांचे निधन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जतमधील ज्येष्ठ कलाकार प्रभा अडावदकर यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. निधन समयी त्या 74 वर्षाच्या होत्या.

संगीत विशारद असलेल्या प्रभा अडावदकर या कर्जत भागात एक गायिका व कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होत्या तसेच अनेक संगीत नाटकातून त्यांनी भूमिकाही केल्या होत्या. त्यांच्या पश्चात पती प्रभाकर अडावदकर, मुलगा आकाशवाणी मुंबई केंद्राचे निवेदक दिनेश अडावदकर, कन्या, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.