Press "Enter" to skip to content

नथुराम कोंडे यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेचे श्रमिक विद्यालय चिल्हे येथील शिपाई या पदावर कार्यरत असलेले व चिल्हे गावचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते नथुराम महादेव कोंडे यांचे वयाच्या ४८ व्या दु:खद निधन झाले.

नथुराम कोंडे यांच्यासारखे एक उमदे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने समस्त कोंडे परिवार,चिल्हे ग्रामस्थ व परिसरातून प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शाळेत शिपाई कर्मचारी म्हणून रूजू झाल्यापासून एक कष्टाळू प्रमाणिक व कामात हजरजबाबी कर्मचारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती.आपल्या चांगल्या स्वभावामुळे सर्व संस्थाचालक, शिक्षकव्रुंद व विद्यार्थी वर्गाशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे व प्रेमाचे तसेच सौदार्याचे संबंध होते.तर सामाजिक कार्यातही त्यांचे नेहमीचेच चांगले योगदान असायचे.तसेच ते एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू व नावाजलेले कबुली पंच म्हणूनही प्रसिद्ध होते.

कोरोना महामारीचे प्रादुर्भावामुळे कोरोना नियमावलीचे पालन करून त्यांचे जवळचे आप्तस्वकीय व ग्रामस्थ यांनी अत्यंत शोकाकूल परिस्थितीत
त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडले.यावेळी माजी सरपंच धनाजी लोखंडे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. तर संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे यांनी एक उमदा व प्रामाणिक कर्मचारी आपल्यातून निघून गेला असल्याची खंत व्यक्त केली.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,तीन बहिणी,चुलतभाऊ असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी सोमवार दि.२८ रोजी तर अंतिम धार्मिकविधी गुरवार दि.१ जुलै रोजी चिल्हे येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.