Press "Enter" to skip to content

अनोखं सेलीब्रेशन ; फादर्स डे निमित्त १५० रोपांची लागवड

मुठवली खु.येथील युवकांचा स्तुत्य उपक्रम

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील मुठवली खु.येथील युवकांनी फादर्स डे चे औचित्य साधून गावातील परिसरात एकूण विविध जातीच्या झाडांचे १५० रोपांची लागवड करून फादर्स डे एका वेगळ्या उपक्रमाने साजरा केला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

यावेळी मालसई ग्रा.पं.उपसरपंच योगेश शिंदे,मंगेश शेळके,लीलाधर नाकती, धनराज शिंदे,मयुरेश तुपकर,
रोशन शिंदे, गौतम सावंत,किरण तुपकर,विनायक सावंत,
चेतन शिंदे,शिवतेज शिंदे आदी युवकांनी एकत्र येऊन सदरचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.

वृक्ष हे आपल्या माता-पित्याप्रमाणे आहेत.कोणतीही अपेक्षा न करता अनादी कालापासून वृक्ष आपल्याला नेहमीच ब-याच गोष्टी देत आले आहेत. आपल्या जीवनात ते आपल्या पालकत्वाचीच भूमिका बजावित आहेत.तर येथील युवकांनी १५० रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकित एकप्रकारे खारीचाच वाटा उचलला असून लावलेल्या रोपांचे मोठ्या व्रुक्षात रुंपातर करण्याचा निश्चय केला असल्याचे व त्यांचे मोठे होईपर्यंत व्यवस्थित संगोपण व संरक्षण केले जाईल तसेच भविष्यात अशाचप्रकारे वृक्ष लागलडीचा आमचा कार्यक्रम चालू राहिल अशाप्रकारची प्रतिक्रिया उपसरपंच योगेश शिंदे यांनी या उपक्रमाची माहिती देताना पत्रकारांना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.