सिटी बेल| खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
कुणबी समाज्जोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहाचे सहसचिव व कुडली गावचे प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत खंडू मुंडे यांचे ह्दयविकाराने दु:खद निधन झाले.त्या समयी ते ५५ वर्षांचे होते.त्यांच्या या निधनाने मुंडे परिवार,कुडली ग्रामस्थ व परिसरातून अत्यंत शोक व्यक्त करण्यात येत आहे.
समाजासाठी मोलाचे योगदान देऊन एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची विशेष ओळख होती.तर एका कंपनीत स्वतःचे काँन्ट्क्ट सांभाळून ते आपला गाव व समाजासाठी आपले योगदान देत असत.समाजाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण समाजासाठी काय करू शकतो,अशाप्रकारची भावना ते नेहमीच बोलून दाखवित असत.तर समाजाचा मेळावा,मासिक मिटिंग व अन्य कार्यक्रम कुठेही असले तरी फार योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत.कोरोना नियमावलीचे पालन करीत अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांचे अंत्यविधी पार पाडण्यात आले.तर समाज एका सच्च्या समाजसेवकास
मुकला असल्याची प्रतिक्रिया अनेक जेष्ठ नेत्यांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
त्यांच्या पश्चात फार मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्र. दि.२५ जून तर अंतिम धार्मिकविधी रवि.२७ जून रोजी कुडली येथील राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment