सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान आ.अनिकेत तटकरे यांच्या आमदार निधीतून २५ लाख रूपयांच्या निधी प्राप्त झाल्याने रोहे तालुक्यातील वरसगाव येथील येथील प्रलंबित राहिलेल्या रस्त्याचे काम पुर्णपणे मार्गी लागले आहे.
येथील पद्मावती नगर ते हाँटेल अनिकेत हा नेहमीचा रहदारीचा असलेला कालव्याचा मार्ग गेली वर्षानुवर्षे कच्च्या स्वरूपात होता.त्यामुळे येथील रहिवासी वर्गाला आपल्या शेती क्षेत्रात किंवा अन्य वहिवाटीच्या वेळेस या रस्त्यावरुन मार्गक्रमण करताना खुप त्रास सहन करावा लागत असे.पावसाळ्यात तर सर्व रस्ता चिखलमिश्रीत झाल्यावर तर येथून प्रवास करणे मोठे जिकरीचे होते.
अशा परिस्थितीत वरसगाव ग्रामस्थांनी आपली रस्त्याची व्यथा रायगडचे खा.सुनील तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे व विधान परिषद आ.अनिकेत तटकरे यांच्याकडे कथन केली असता आ.अनिकेत तटकरे यांनी त्वरित दखल घेऊन आपल्या आमदार निधीतून रू.२५ लाखाच्या निधीचे पत्र देऊन व पुढील कार्यवाही पुर्ण करून ग्रामस्थांचा अत्यंत गरजेचा व जिव्हाळ्याचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून खराब रस्त्याच्या त्रासातून सुटका मिळवून दिली आहे.
वर्षानुवर्षे ऊन्हाळी हंगामात धुळ तर पावसाळ्यात चिखलमिश्रीत रस्त्यावरुन मार्गक्रमण करताना ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असे. परंतू आ.अनिकेत तटकरे यांनी याबाबतचा प्रश्न मार्गी लावल्याने समस्त ग्रामस्थांना मोठाच दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया येथील माजी सरपंच संजय राजिवले यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे तर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने वरसगाव ग्रामस्थ व महिला वर्गाने आ.अनिकेत तटकरे यांचे विशेष आभार मानले आहेत.








Be First to Comment