Press "Enter" to skip to content

माथेरान मधील शिवसेनेच्या बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेबाबतीत ३० जूनला सुनावणी

सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |

माथेरान नगरपरिषदेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली होती.त्यावेळी एकूण सतरा जागांपैकी चौदा जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते.तेव्हापासून ते आजपर्यंत जवळपास साडेचार वर्षे सर्वजण एकत्रित कामे करण्यासाठी पुढाकार घेत होते गुण्यागोविंदाने सर्वकाही सुरळीत चालू असताना आपसात अंतर्गत मतभेदांमुळे यातील उपनगराध्यक्ष आणि एक स्वीकृत सदस्य अशा एकूण दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये मे महिन्यात प्रवेश केला होता.

या सर्वांना पुन्हा पक्षात येण्यासाठी संधी देण्यात आली होती परंतु ह्या पक्षांतर केलेल्या नगरसेवकांनी त्यास कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिला नाही.याबाबत दि.२७ मे रोजी सायंकाळी शिवसेना पक्षाची बैठक होऊन सदर नगरसेवकांनी केलेल्या पक्षांतर बाबत शिवसेना व उपस्थित गटनेते ह्यांनी विचारविनिमय करून आपण पक्षांतराची कृती क्षमारपित करण्यात आली नाही असे जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरविकास विभाग श्रेणी-१ रायगड अलिबाग यांना कळविले.

त्यानुसार महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अर्हता अधिनियम १९८६ चे कलम३(१) कलम ५ यातील तरतुदीच्या अधीन राहून कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा आघाडीच्या किंवा फ्रंटच्या असणाऱ्या सभासदांना किंवा सदस्यांनी (अ ) जर अशा राजकीय पक्षाचे किंवा आघाडीचे किंवा फ्रंटचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडुन दिले तर तो सभासद किंवा सदस्य राहण्यास अर्हत (अपात्र) होईल.महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम १९८७ मधील कलम ७ (५) अन्वये कोणत्याही प्रश्नावर निर्णय देण्यासाठी आणि पोटनियम (४ ) अन्वये प्राथमिक जी कार्यपद्धती अनुसरण्यात येईल ती पोटनियम (६ ) ते (१५) नुसार कारवाई करण्यापूर्वी या पक्षांतर केलेल्या सदस्यांनी आपली बाजू मांडणेकामी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे ३० जून २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता सुनावणी आयोजित करण्यात आली आहे आणि सदर सुनावणीला पक्षांतर केलेले सदस्य उपस्थित न राहिल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे.

त्याबाबतच्या पत्राची प्रत जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरविकास विभाग श्रेणी-१ रायगड अलिबाग यांनी मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद यांना देण्यात आली आहे.माथेरानच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा अशाप्रकारे ही घटना घडली आहे त्यामुळे ३० जूनला काय निर्णय होईल याकडे संपूर्ण माथेरान करांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.