सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी औद्योगिक क्षेत्रातील तुराडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक नुकताच पार पडली.यात विश्वनाथ गायकवाड हे उपसरपंचपदी बिनविरोध झाले.
आपला पत्रकार मित्र उपसरपंच झाल्याने त्यांचे कौतुक करण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे , उपाध्यक्ष राकेश खराडे, सचिव डॉ. वैभव पाटील, सहसचिव अमोल सांगळे, सदस्य ज्ञानेश्वर कोळी, एकनाथ सांगळे, फोटोग्राफर पॅडी कुरंगळे , चंद्रकांत मुंढे यांनी विश्वनाथ गायकवाड यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना गायकवाड यांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असून शासकीय योजनांच्या माध्यमातून येथील जनतेला अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले .








Be First to Comment