Press "Enter" to skip to content

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत “तू चांदणी”कवितेस उत्कृष्ट काव्य पुरस्कार

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

काव्यांगण समूह नागपूर यांच्यावतीने नुकतेच काव्यधारा राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा 2021 चे आयोजन करण्यात आले होते.

या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 147 कवींनी भाग घेतला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेत रसायनीतील साहित्यिक कवी अनिल दाभाडे यांच्या ” तू चांदणी..” या कवितेला उत्कृष्ट म्हणजे काव्य पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या कवितेविषयी थोडक्यात…. कवि अनिल दाभाडे यांनी “तू चांदणी”ही कविता एका समूहासाठी लिहिली होती. आणि मग काव्यांगण समूह नागपूर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत अगदी शेवटच्या काही तासात दाभाडे यांनी पाठविली होती. तोपर्यंत जवळपास 140 कविंनी आपल्या कविता स्पर्धेत पाठविल्या होत्या. आणि या भव्यदिव्य झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अनिल दाभाडे यांच्या कवितेला यश लाभले.

अनिल दाभाडे हे पक्षीमित्र, साहित्यिक,लेखक,कवी अशी त्यांची गेल्या तीस वर्षांपासून सर्वांना ओळख आहे.त्यांना राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर वर्षांव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.