Press "Enter" to skip to content

दिपक पाटील कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

चौक वावर्ले येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपकदादा गणपत पाटील यांच्या कोरोना काळातील कार्यांची दखल घेऊन त्यांना आर.के.बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माजी गृहमंत्री रमेश बागवे, योगगुरू मनाची मशागत व्याख्याते डॉ.दत्तात्रेय कोहिनकर ,वास्तुविशारद अनिल पिंपलकर यांच्याहस्ते कोरोना योध्दाने सन्मानित करण्यात आले.

यावेळी पिएसआय गायके,पिएसआय सय्यद, अविनाश बागवे आदी उपस्थित होते.दिपक पाटील यांच्या कानसा वारणा फाउंडेशनचे कोरोना काळातील कार्य प्रशंसनीय आहे.त्यांनी अनेक कोविड सेंटरला भेट देऊन अन्नदान, आर्थिक सहाय्य केले आहे.नुकताच आमदार निलेश लंके यांच्या पारनेर येथील जलमंदिर शरद पवार कोविड सेंटरला भेट देऊन एकवीस हजार रुपयांचा धनादेश व अन्नदान वाटप केले.तर सुनील अण्णा शेलके यांच्या पवनानगर कोविड सेंटरला एकवीस हजार रुपयांचा धनादेश दिला.

कोरोना कालात राज्यातील विविध जिल्ह्यांत गरजूंना जिवनावश्यक वस्तूं, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्याचे काम कानसा वारणा फाउंडेशनकडून सुरुच आहे.दिपक गणपत पाटील यांच्या या कार्यांची दखल घेऊन आर.के.बहुउ्देशीय संस्थेकडून कोरोना योध्दाने सन्मानित करण्यात आले आहे.दिपक पाटील यांना कोरोना योध्दाने सन्मानित केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.