सिटी बेल | पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील कोप्रोली कणे येथील जवळपास 500 ते 550 एकर भातशेतीचे खारबंदिस्ती नसल्यामुळे मागिल 25 वर्षं येथील भातशेती नापीक झाली होती. या खारबंदिस्तीसाठी जगनशेठ म्हात्रे यांच्यासह शेतकऱ्यांनी खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेऊन कोप्रोली कणे येथील भातशेती वाचविण्यासाठी खारबंदिस्तीची गरज असल्यामुळे शेतकऱ्यांच्या या मागणीनुसार खासदार तटकरे यांनी जेएसडब्ल्यु कंपनीला शिफारस पत्र देऊन सीएसआर फंडातून येथील पाच किलोमीटरची खारबंदिस्ती बांधण्यात आली असल्याने त्यामुळे या कामाचे श्रेय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचे रायगड जिल्हा सरचिटणीस जगनशेठ म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कोप्रोली ते कणे या गावातील बंदिस्ती ही शासनाच्या खारलॅन्ड विभागामार्फत होत नसल्याने येथील शेतकरी या नापीक भातशेतीमुळे अनेक वर्षे चिंताग्रस्त होते.त्यामुळे कोप्रोली ग्रामस्थांनी एक समिती स्थापन करून जिल्हा सरचिटणीस जगनशेठ म्हात्रे यांच्या पुढाकारातून रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेतल्यानंतर हे काम जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यासाठी त्यांनी शिफारस पत्र दिल्यानंतर हे काम मंजूर करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी या कामात कोणताही अडथळा निर्माण न करता गावातील नागरीकांनी स्वता मेहनत घेऊन या कामाला हातभार लावला आहे. परंतु या कामाचे कोट्यवधी रुपयांचे बिल काढण्याची धडपड काही राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून सुरू असल्याने या कामाचे खोटे बिल आम्ही कदापीही काढू देणार नसून या कामाचे पूर्ण श्रेय खासदार सुनिल तटकरे यांचेच आहे.असे वक्तव्य जगनशेठ म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.








Be First to Comment