सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
सर्पमित्र प्रणय जाधव याने विषारी व बिनविषारी सापांना सुरक्षितरित्या पकडून त्यांना जीवदान देण्याचे जणू धडपडच चालविली असून त्याने पुन्हा एकदा तालुक्यातील मेढे येथे असलेल्या राहूल घोडिंदे यांचे ऋतूराज फारँमहाऊसवर अत्यंत विषारी असलेल्या पाच फुटी कोब्रा सापास सुरक्षितरित्या पकडून दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सर्पमित्र प्रणय जाधव हा वाघेश्वर नगर रोठ खु.येथील रहिवासी असून सर्पमित्र म्हणून त्याची विशेष ओळख आहे.गेली काही वर्षात तो सर्पमित्र म्हणून सर्व परिचित झाला असून आतापर्यंत त्याने शेकडो विषारी व बिनविषारी सापांना जीवदान दिले आहे.तर या एका महिन्याच्या कालावधीत तर त्याने जवळपास २० साप पकडून सुरक्षितरित्या सोडून दिले आहेत.
मेढे येथील ऋतूराज फारँमहाऊस येथे विषारी कोब्रा साप असल्याची माहिती तेथील विद्या घोडिंदे यांच्याकडून प्राप्त होताच प्रणय याने तिथे अडचणीत लपून राहिलेल्या कोब्रा सापास मोठ्या कौशल्याने पकडून जीवदान दिले आहे. तर त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.








Be First to Comment