Press "Enter" to skip to content

झेप फाउंडेशनने राजिप ला दिले १ लाख ६ हजार ट्रिपल लेयर मास्क भेट

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

आरोग्य कर्मचारी यांना कोरोना काळात वैद्यकीय सेवा देताना आवश्यक साहित्य यांची कमतरता भासू नये यासाठी अलिबाग तालुक्यातील पेझारी आंबेपुर येथील झेप फाउंडेशनने रायगड जिल्हा परिषदेस एक लाख सहा हजार ट्रिपल लेयर मास्क भेट दिले आहेत

रायगड जिल्ह्यात कोव्हिडं19 या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रुग्ण संख्यामध्येही वाढ होत आहे.ही बाब चिंताजनक आहे. कोव्हिडंड १९ च्या प्रादुर्भावशी मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, कार्यरत आशा सेविका यांना आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आवाहन करण्यात आले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत पेझारी आंबेपुर येथील झेप फाउंडेशनने जिल्हा परिषदेस एक लाख सहा हजार ट्रिपल लेयर मास्क भेट उपलब्ध करून देण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्या आणि झेप फाऊंडेशनच्या संस्थापिका चित्रा आस्वाद पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेस सुपूर्त करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.