सिटी | रसायनी | राकेश खराडे |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोले व युवकचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खालापूर काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे रसायनी येथे सामान्य नागरिक ,रिक्षाचालक, छोटे दुकानदार यांना प्रत्येकी ५ मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष नाना म्हात्रे ,सरपंच कृष्णाशेठ पारंगे, रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अशोक मुंढे,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव निखिल डवळे, महिला उपाध्यक्षा दिपाली म्हात्रे,रायगड जिल्हा युवक उपाध्यक्ष सागर सुखदरे, रायगड जिल्हा युवक काँग्रेस सचिव प्रशांत खाने,उपसरपंच दिनकर म्हात्रे , ग्रामपंचायत सदस्य विनायक डवळे,उरण विधानसभा सचिव सुरज पाटील , खालापूर तालुका अध्यक्ष कुणाल जाधव , रसायनी विभाग युवक अध्यक्ष संदेश डवळे,एनएसयुआयचे नेते अक्षय मुंढे व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment